दाभोलकर-पानसरेप्रकरणी सनातनचा सहभाग नाही

संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांचा दावा

पुणे – गेली 6 वर्षे दाभोलकर-पानसरे हत्येसंदर्भात सीबीआय आणि विशेष तपास पथके तपास करत आहेत; मात्र एकाही यंत्रणेला सनातन संस्थेच्या सहभागाचा काहीही पुरावा मिळालेला नाही. या उलट नक्षलवाद्यांना सहाय्य करणाऱ्या संस्थांच्या गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या सूचित अंनिसचे नाव होते, त्यामुळे अशा संस्थेवरच शासनाने कारवाई करावी, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाड यांना 19 महिन्यांनी जामिनावर मुक्त करण्याची वेळ आली, तसेच तीन वर्षांनंतरही डॉ. तावडे यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी एकही पुरावा यंत्रणांकडे नाही. विविध प्रकरणांत सनातनेने आरोप केले असून त्याचे उत्तर देण्याचे आव्हान देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.