मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री सना खानने गतवर्षी गुजरातमधील मुफ्ती अनस सईदसोबत विवाह केला होता. त्यानंतर तिच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. तिला आधीचा बॉयफ्रेंड आणि सध्याच्या पतीवरून देखील तिला ट्रोल केले गेले.
तिने त्यावर अद्याप कोणतेही भाष्य केले नव्हते; पण आता सोशल मीडियावर सना खानच्या एका भावनिक पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सना खानने नुकतीच एक पोस्ट केलेली असून, यात तिने अतिशय दु:ख झाल्याचे म्हटले आहे.
काही लोक मागील अनेक दिवसांपासून माझ्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. याचबरोबर अनेक नकारात्मक व्हिडिओ तयार करत आहेत. अनेक दिवसांपासून हे सुरू आहे. परंतु मी अजूनपर्यंत गप्प होते. ज्या व्यक्तीला मी पूर्णपणे विसरली आहे, त्याने जुन्या गोष्टींची आठवण काढून देणे चुकीचे असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जर कोणाचं तुम्ही समर्थन करू शकत नसाल, तर त्याच्याबद्दल वाईट तरी बोलू नये असेदेखील आपल्या पोस्टमध्ये सना म्हणाली आहे.
दरम्यान, मुफ्ती अनस सईदसोबत विवाह करण्याआधी सना खान कोरिओग्राफर मेल्विन लुईसला डेट करत होती. त्याने धोका दिल्याचा आरोप करत सनाने त्याच्याबरोबर ब्रेकअप केले होते.