Samruddhi Mahamarg – समृद्धी महामार्गांवर जीवघेणा खड्डा पडल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे लोहोगाव पुलावरील खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या महामार्गालाच भगदाड पडल्याने समृद्धी महामार्गांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. । Samruddhi Mahamarg News
जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरत ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाला अवघ्या वर्षभराचा कालावधी उलटला आहे. । Samruddhi Mahamarg News
मात्र, उद्धाटनानंतर काही महिन्यातच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर शुक्रवारी अचानक खड्डा पडला.
महामार्गाजवळून काही शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. । Samruddhi Mahamarg News
१२० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहन अशा खड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.