पुणे – सिम्बायाेसिस इंटरनॅशनल युनिर्व्हिसिटीमध्ये एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. समीधा कालिदास राऊत (वय-20,रा.गडचिराेली) असे त्या तरुणीचे नाव आहे. तिच्या कुटुंबियांनी सदर आत्महत्या ही संशयास्पद असल्याचा आराेप केला आहे.
समीधा राऊत ही मुळची गडचिराेली येथील राहणारी असून ती विमाननगर येथील सिम्बायाेसिस गर्ल्स हाॅस्टेल मध्ये राहत हाेती. ती राहत असलेल्या मिथिला इमारतीच्या खाेलीत एक एप्रिल राेजी रात्री दहा वाजण्याचे सुमारास ती तिच्या खाेलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
वस्तीगृहाच्या कर्मचाऱ्यांनी तिचा पंख्याला लटकलेला मृतदेह खाली उतरवून तपासाणीकरिता डाॅक्टरांना बाेलवले आणि पाेलिसांना सांगण्यात आले. डाॅक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती मृत असल्याचे सांगितले. पाेलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. नेमके काेणत्या कारणास्तव तिने आत्महत्या केली याचा अद्याप उलगडा झाला नसून, याबाबत पाेलीस पुढील तपास करीत आहेत.