मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा समावेश असलेल्या ड्रग्स ऑन क्रुझ प्रकरणाचा तपास एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, वानखेडे हे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर म्हणून कायम राहणार आहेत. आता संजय सिंग आर्यन खान प्रकरणाची चौकशी करणार आहेत. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाच्या तपासातूनही समीर वानखेडे यांना हटवण्यात आलं आहे. एकूण सहा प्रकरणातून समीर वानखेडे यांना हटवण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीचे केंद्रीय पथक आर्यन खान प्रकरणाची चौकशी करणार आहेत. त्याचे नेतृत्व संजय सिंह करणार आहेत. समीर वानखेडे आता या प्रकरणापासून अलिप्त झाले आहेत.
दरम्यान, आर्यन प्रकरणादरम्यान समीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप झाले होते, एका साक्षीदाराने वसुलीची बाबही सांगितली होती, त्यामुळे सध्यातरी हे खटले त्याच्याकडून मागे घेण्यात आले असून, संजय सिंह हे तपास करणार आहेत.
I've not been removed from investigation. It was my writ petition in court that the matter be probed by a central agency. So Aryan case & Sameer Khan case are being probed by Delhi NCB's SIT. It's a coordination b/w NCB teams of Delhi & Mumbai:NCB Zonal Dir Sameer Wankhede to ANI pic.twitter.com/Hf7ZrjwVex
— ANI (@ANI) November 5, 2021
दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. “मला चौकशीतून काढून टाकण्यात आलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी व्हावी, अशी माझी न्यायालयात रिट याचिका होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाची दिल्ली एनसीबीची एसआयटी चौकशी करत आहे. हे दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी टीम्स दरम्यानचा परस्पर समन्वय आहे,” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांची प्रतिक्रिया –
“समीर वानखेडेला आर्यन खान केससह ५ प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आलं. अशी २६ प्रकरण आहेत ज्यांचा योग्य तपास करणं गरजेचं आहे. ही एक चांगली सुरुवात आहे. सिस्टीम साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”