मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनला ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. आर्यनच्या अटकेनंतर एनसीबीच्या या कारवाईबाबत व अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी तर, वानखेडे हे बॉलिवूड सेलिब्रिटीजकडून कारवाईचा धाक दाखवत मोठी रक्कम वसुलत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर दुसरीकडे वानखेडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत.
हे सर्व सुरु असतानाच आज याबाबत एक मोठी घडामोड घडली आहे. एनसीबीने आर्यन खानचा समावेश असलेल्या ड्रग्ज ऑन क्रूझ प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतला आहे. याप्रकरणाचा तपास आता एनसीबीच्या दिल्ली टीमकडून करण्यात येणार आहे. वानखेडे यांच्याकडून एकूण ६ प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला असून यात आर्यन खानसह नवाब मलिक यांचे जावई समीर खान प्रकरणाचा देखील समावेश आहे.
Mumbai | Total 6 cases of our zone will now be investigated by Delhi teams (of NCB), including Aryan Khan’s case and 5 other cases. It was an administrative decision: Mutha Ashok Jain, Deputy DG, South-Western Region, NCB
(File photo) pic.twitter.com/vmjP65YOOv
— ANI (@ANI) November 5, 2021
अशातच आता वानखेडे यांना या प्रकरणाच्या तपासातून हटवण्यात आल्यानंतर नवाब मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर मलिक लिहतात, “समीर वानखेडेला आर्यन खान केससह ५ प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आलं. अशी २६ प्रकरण आहेत ज्यांचा योग्य तपास करणं गरजेचं आहे. ही एक चांगली सुरुवात आहे. सिसस्टीम साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”
दरम्यान, ड्रग्ज व क्रूझ प्रकरणात कारवाई झाल्यानंतर नवाब मलिक यांनी सातत्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना धारेवर धरलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी, बोगस जातप्रमाणपत्र दाखवत नौकरी मिळवल्याचे, बॉलिवूड सेलिब्रिटीजकडून कारवाईच्या धाकाने पैसे उकळल्याचे गंभीर आरोप लागवलेत. मलिक यांच्या आरोप नाकारत वानखेडे यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
Sameer Wankhede removed from 5 cases including the Aryan Khan case.
There are 26 cases in all that need to be probed.
This is just the beginning… a lot more has to be done to clean this system and we will do it.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 5, 2021