समाजवादी पक्षाचा दिल्लीत बसप आणि आपला पाठिंबा

नवी दिल्ली – समाजवादी पक्षाने (सप) दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्ष (बसप) आणि आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला. दिल्लीत सपने स्वत:चे उमेदवार रिंगणात उतरवलेले नाहीत. त्यामुळे त्या पक्षाने दिल्लीतील सातपैकी पाच जागा लढवणाऱ्या बसपला पाठिंबा दिला. उर्वरित दोन जागांवर सपने आपच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ केला. उत्तरप्रदेशात सप आणि बसपने रालोदला बरोबर घेऊन महाआघाडी स्थापन केली आहे. त्या राज्यातील मैत्रीधर्म दिल्लीत निभावताना सपने आपच्या रूपाने आणखी एक मित्र जोडण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीत प्रामुख्याने भाजप, कॉंग्रेस आणि आपमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. तिथे सहाव्या टप्प्यात 12 मे यादिवशी मतदान होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.