संगमनेरमध्ये प्रवरेतून वाळू चोरीचे सत्र कायम

संगमनेर – महसूल व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून, संगमनेर परिसरातील प्रवरा नदी पात्रातून अवैध गौण खनिज चोरी सुरूच आहे. शनिवारी (4 मे) रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अवैध वाळू चोरी प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले.

वाळू चोरीप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास संगमनेर ते निंबाळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कूलसमोर पिकअप (एमएच. 04 सीए. 8339) मधून दोन हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू चोरून नेतांना आढळून आला. पोलिसांनी पाहून चालकाने पलायन केल्याने, 1 लाख 92 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणी शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिकअप (एमएच. 15 एसी. 1554) मधून दोन हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू चोरी करताना आढळला. या वाहनाच्या चालकानेही पलायन केल्याने, पोलिसांनी 1 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.