मुंबई – सलमान खान आणि दिग्दर्शक प्रभूदेवा तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत. ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटातून हे दोघे एकत्र येणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. सलमान खानने या चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केले होते. यातच सलमानने आता या चित्रपटातील त्याच्या फर्स्ट लुकचा व्हिडिओ शेअर केला आहे.
#RadheEid2020 . . . Day 1 pic.twitter.com/o9GLYTjMtt
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) November 4, 2019
दरम्यान, ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट पुढील वर्षी 2020 च्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पहायला मिळत आहे. सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री दिशा पटानी, अभिनेता रणदीप हुड्डा, जॉकी श्रॉफ, अभिनेता सोहेल खान, दिग्दर्शिक प्रभूदेवा, आणि सलमान खान दिसत आहेत.