मुंबई – आपल्या आवडत्या सेलिब्रेटीची सवय किंवा स्टाईल अनेक फॅन्स कॉपी करतात. अभिनेता सलमान खानचा देखील त्यात समावेश आहे. सलमानच्या बॉडी पासून ते लूक स्टाईलपर्यंत सर्व काही त्याच्या चाहत्यांना आवडते म्हणून चाहते त्या गोष्टी फॉलो करतात. सलमान खानाच्या हातात असलेले ब्रेसलेट देखील अनेक चाहते घालतात. सलमानच्या हातातील हे ब्रेसलेट त्याची खूप जुनी ओळख आहे. त्याने हे का घालायला सुरुवात केली याबाबतचा खुलासा स्वतः सलमानने एका मुलाखतीत केला आहे.
सलमान खान सांगतो, “माझ्या वडिलांच्या हातात असेच एक ब्रेसलेट होते. मी लहान असताना त्यांच्या हातातील ब्रेसलेटसोबत खेळत बसायचो. ज्यावेळी मी मोठा झालो आणि अभिनय क्षेत्रात काम करायला लागलो त्यावेळी माझ्या वडिलांनी हे ब्रेसलेट मला गिफ्ट दिले.” असा खुलासा स्वतः सलमानने एका मुलाखतीत केला आहे.
यामुळे ब्रेसलेट खास आहे
याशिवाय सलमान खानने असेही सांगितले की ब्रेसलेटमधील हा निळ्या रंगाचा स्टोन नकारात्मकता दाखवून देऊ शकतो. जेव्हा कधी माझ्यासोबत काही निगेटिव्हिटी घडते तेव्हा हा दगड तुटतो. माझ्यावर जर काही निगेटिव्हिटी असेल तर आधी हा स्टोन ती घेतो आणि तुटतो. हा माझा सातवा स्टोन आहे असं देखील सलमानने यावेळी सांगितले.
View this post on Instagram
या चित्रपटांची आतुरता
सलमान शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. याशिवाय, लवकरच तो त्याच्या हिट फ्रँचायझी ‘टायगर जिंदा है’चा पुढचा भाग ‘टायगर 3’ मध्ये कतरिना कैफसोबत दिसणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. यासोबतच सलमान ‘कभी ईद कभी दिवाली’मध्येही काम करत आहे.