बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याने आपल्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या नव्या चित्रपटाची घोषणा शुक्रवारी केली. त्याचा हा आगामी चित्रपट पुढील वर्षाच्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे, असेही त्याने या वेळी जाहीर केले.
साजिद नाडियादवाला यांची निर्मिती आणि लेखन असलेल्या या चित्रपटाबाबतची माहिती सलमानने ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.
Announcing my next film… KABHI EID KABHI DIWALI ….
STORY & PRODUCED BY SAJID NADIADWALA …
DIRECTED by FARHAD SAMJI…EID 2021 … #SajidNadiadwala @NGEMovies @farhad_samji @WardaNadiadwala @SKFilmsOfficial
— Salman Khan (@BeingSalmanKhan) January 10, 2020
‘हाऊसफुल्ल-4’चे दिग्दर्शक फरहाद सामझी हेच सलमानच्या या नव्या चित्रपटाला दिग्दर्शन देणार आहेत. याआधी सलमानच्या ‘दबंग-3’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.
यानंतर तो लवकरच प्रभूदेवाच्या दिग्दर्शनाखालील ‘राधे’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा सिनेमाही पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावरच प्रदर्शित होणार आहे.