IPL 2024 (RR vs SRH Match 50, records and statistics) : आयपीएल 2024 च्या 50 व्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. या एकाच सामन्यात अनेक विक्रम झाले. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. जिथे हैदराबादने राजस्थानचा रोमहर्षक पद्धतीने 1 धावाने पराभव केला. या विजयाचा हिरो भुवनेश्वर कुमार होता. यासह हेनरिक क्लासेननेही 19 चेंडूत नाबाद 42 अशा महत्त्वपूर्ण धावा करत हैदराबादला स्पर्धेत पाचव्यांदा 200 धावांचा टप्पा पार करून दिला.
विशेष म्हणजे या सामन्यात अनेक विक्रमही झाले. सर्वप्रथम, सनरायझर्स हैदराबादचा हा आयपीएल इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात लहान विजय होता. जिथे विजयासाठी फक्त 2 धावांची गरज होती. भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर राजस्थानच्या रोव्हमन पॉवेलला बाद करून संघाला केवळ एका धावेनं विजय मिळवून दिला. दुसरा, हैदराबादच्या फलंदाजांनं एका डावात सर्वाधिक षटकार मारले. या सामन्यात नितीश कुमार रेड्डी याने 42 चेंडूत 3 चौकार अन् 8 षटकाराच्या मदतीने नाबाद 76 धावा केल्या.
तिसरे, राजस्थान रॉयल्सचा धावांच्या बाबतीत पराभवाचा फरक आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी होता. राजस्थानने हा सामना अवघ्या एका धावेनं गमावला.
चौथा, आयपीएलमध्ये पराभवाचा पाठलाग करताना खेळलेली सर्वात मोठी भागीदारी. या सामन्यात राजस्थानच्या यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांच्यात चौथ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी झाली.
1. आयपीएलमधील SRH चा सर्वात कमी फरकाने विजय
1 धावेनं विजय SRH vs RR (IPL2024)
2 धावेनं विजय SRH vs PBKS (IPL2024)
3 धावेनं विजय SRH vs MI (IPL 2022)
4 धावेनं विजय SRH vs DC (IPL 2014)
4 धावेनं विजय SRH vs RPS (IPL 2016)
4 धावेनं विजय SRH vs RCB (IPL2021)
2. आयपीएलच्या एका डावात SRH फलंदाजाचे सर्वाधिक षटकार
डेव्हिड वॉर्नर : 8 षटकार ( SRH vs KKR, IPL 2017)
मनीष पांडे : 8 षटकार (SRH vs RR, IPL 2020)
हेनरिक क्लासेन : 8 षटकार (SRH vs KKR, IPL 2024)
ट्रॅव्हिस हेड : 8 षटकार (SRH vs RCB, IPL 2024)
निशांत रेड्डी : 8 षटकार ( SRH vs RR, IPL 2024)
IPL 2024 : इंग्लंडमुळे संपणार का प्लेऑफचा थरार? ‘हे’ 8 खेळाडू परतणार मायदेशी, जाणून घ्या कारण….
3. आयपीएलमध्ये राजस्थानचा सर्वात कमी फरकाने पराभव (धावांनी)
1 धाव : (RR vs DC, IPL 2012)
1 धाव : (RR vs SRH, IPL 2024)
4 धावा : (RR vs MI, IPL 2010)
4 धावा : (RR vs DC, IPL 2018)
4 धावा : (RR vs PBKS, IPL 2021)
4. आयपीएलमधील पराभवाचा पाठलाग करताना सर्वात मोठी भागीदारी
135 धावा : (केन विल्यमसन – मनीष पांडे, SRH vs RCB, IPL 2018)
134 धावा : (यशस्वी जैस्वाल – रियान पराग, SRH vs RR, IPL 2024)
126 धावा : (फाफ डू प्लेसिस – ग्लेन मॅक्सवेल, RCB vs CSK, IPL 2023)