मुंबई – साऊथ सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक सई पल्लवी तिच्या निर्दोष शैलीसाठी ओळखली जाते. नेहमी मजेत असलेली साईपल्लवी आपला मुद्दा ठेवण्यास कधीही मागेपुढे पाहत नाही. दरम्यान, सई पल्लवीने आपल्या बालपणातील एक मजेदार किस्सा शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने प्रेमपत्रामुळे लहानपणी खूप मार खाल्ल्याचे सांगितले आहे.
View this post on Instagram
नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध चॅट शो माय व्हिलेज शोमध्ये सई पल्लवी पोहोचली. यावेळी त्याच्यासोबत विराट पर्वम चित्रपटाचा मुख्य अभिनेता राणा दग्गुबतीही उपस्थित होता. अशात शोच्या अँकरने सई पल्लवीला बालपणीच्या काही संस्मरणीय गोष्टींबद्दल प्रश्न विचारला. ज्यावर सई पल्लवीने उत्तर दिले की, लहानपणी एकदा आई-वडिलांनी तिला खूप रागावले होते. खरं तर साई पल्लवी म्हणाली, “जेव्हा मी सातव्या वर्गात शिकत होते. तेव्हा एका मुलाने माझ्या शाळेच्या बॅगेत प्रेमपत्र टाकले. जे नंतर माझ्या पालकांच्या हाती पडले. त्यानंतर मला खूप रागावण्यात आले आणि मारहाण करण्यात आली.” असे असले तरी साईपल्लवीने हे अतिशय मजेशीर पद्धतीने सांगितले आहे.
View this post on Instagram
साई पल्लवी आणि राणा दग्गुबती यांचा विराट पर्वम चित्रपट 17 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पण प्रेक्षकांना हा चित्रपट फारसा आवडला नाही. यानंतर निर्मात्यांनी तो 1 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित केला. त्यामुळे साई पल्लवी तिच्या चित्रपटाच्या OTT प्रमोशनसाठी नेटफ्लिक्सच्या चॅट शोमध्ये पोहोचली होती.