बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्राने आपल्या आगामी थ्रिलर चित्रपटाचे लंडनमध्ये नुकतेच शूटिंग पूर्ण केले आहे. आता ती अमोल गुप्ते यांच्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. हा चित्रपट भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवालाची बायॉपिक आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ मुंबईत 11 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. याबाबत अमोल गुप्ता म्हणाले, पहिला दिवशाचे शूट नीलेश कुलकर्णी यांच्या इंस्टिट्यूशन इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पॉर्टस मॅनेजमेंट येथे होणार आहे. तसेच पहिल्या सीनमध्ये सायनाच्या भूमिकेत परिणिती पत्रकार, विद्यार्थी आणि स्पॉर्टस मॅनेजमेंटशी संबंधीत व्यक्तींना मुलाखत देताना दिसेल.
दरम्यान, परिणीती 6 महिन्यांपासून या भूमिकेसाठी कसून सराव करत आहे. यासाठी ती सायनाचे प्रशिक्षक ईशान नक्वी यांना लंडनलाही घेवून गेली होती. ईशानसह अनेकजण दिला ट्रेनिंग देत असून यात सायनाचे पहिले मेंटर श्रीकांत यांच्याही सहभाग आहे.
परिणीति ठाणे येथील त्याच कोर्टवर प्रशिक्षण घेत आहे, जिथे सायना सराव करत होती. ती दररोज दोन तास बॅडमिंटन खेळत असून भूमिकेला न्याय देण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. दरम्यान, 2020मध्ये होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.