हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ऍक्शन पॅक्ड “वॉर’ची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुपरफास्ट वेगाने सुरू आहे. 2 ऑक्टोबरला रिलीज झाल्यावर “वॉर’ने केवळ चारच दिवसांमध्ये 100 कोटींचा पल्ला पार केला आहे. आता “वॉर’ ची घोडदौड 200 कोटींच्या दिशेने सुरू आहे.
कालच्या रविवारी “वॉर’ने 35.5 ते 36 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची खबर आहे. या वेगाने जर “वॉर’ची कमाई होत असेल, तर आतापर्यंत या सिनेमाने 158 कोटी रुपयांची कमाई केली असणार आहे. नेहमीपेक्षा शनिवारी 30 टक्के जास्ती कमाई झाली आहे, असे “बॉक्स ऑफिस इंडिया’ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. “वॉर’ची हिंदी आवृत्ती तब्बल 3800 थिएटरमधून रिलीज केली गेली आहे.
याशिवाय तमिळ आणि तेलगू भाषांमधील “वॉर’ची कमाई वेगळीच आहे. हे आकडे तर केवळ हिंदी “वॉर’चे आहेत. आज नवनी आणि दसऱ्याची सुटी गृहित धरली तर सिनेमाच्या कलेक्शनमध्ये आणखीन भरच पडणार आहे. या आठवड्याच्या अखेरीपर्यंतच “वॉर’ची 200 कोटींची कमाई होऊन जाईल, असा अंदाज आहे.
हृतिक रोशन आणि टायगरचे स्टंट प्रेक्षकांना खूपच आवडले आहेत. या दोघांशिवाय आशुतोष राणा आणि वाणी कपूर हे देखील मुख्य भूमिकांमध्ये आहेत.