Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला काल मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेव्हा त्याचे चाहते सतत सैफ अली खानच्या तब्येतीचे अपडेट्स विचारत होते. काल अचानक रुग्णालयात दाखल झाल्यामुळे सगळेच काळजीत पडले होते. मात्र, त्याला शस्त्रक्रियेसाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तो घरी परतला आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानने पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली आहे. 22 जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्या हाताच्या कोपरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या तो बरा आणि निरोगी आहे. नुकतंच सैफ करीना कपूरसोबत त्याच्या वांद्रे येथील घराबाहेर दिसला.
View this post on Instagram
यादरम्यान सैफ अली खान आणि करीना कपूर खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसले. यावेळी सैफने निळ्या रंगाच्या टी-शर्टसोबत डेनिम जीन्स घातली आहे. तसेच, त्याच्या हातावर पट्टी बांधलेली आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत.
सैफवर ट्रायसेप्सची शस्त्रक्रिया झाली
शस्त्रक्रियेबद्दल सांगायचे तर सैफ अली खानने ट्रायसेप्स सर्जरी केली आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, तो बऱ्याच दिवसांपासून या समस्येचा सामना करत आहे. शूटिंगदरम्यानच त्याच्या वेदना आणखी वाढल्या. कधी वेदना कमी, कधी खूप.
त्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. याआधीही सैफला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2016 मध्ये रंगून चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ सेटवर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्या अंगठ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.