ICC Men’s ODI Team of the Year in 2023 : आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम वनडे संघ जाहीर केला आहे. आयसीसी एकदिवसीय संघात भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून आला आहे. रोहित शर्माची ICC ODI संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय विराट कोहलीसह एकूण 6 भारतीय खेळाडूंची ICC ODI संघासाठी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना स्थान मिळाले आहे.
Eight players that featured in the #CWC23 Final have made the cut for the ICC Men’s ODI Team of the Year in 2023 ✨
Details 👇https://t.co/AeDisari9B
— ICC (@ICC) January 23, 2024
ICC ODI संघात ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान…
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची ICC ODI टीम ऑफ द इयरमध्ये सलामीवीर म्हणून निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडची क्रमांक-3 साठी निवड झाली. याशिवाय भारतीय दिग्गज विराट कोहली आणि न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल अनुक्रमे चौथ्या क्रमांकावर आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हेनरिक क्लासेनला यष्टिरक्षक म्हणून ICC ODI संघात स्थान मिळाले आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू मार्को युनसेन ICC ODI टीम ऑफ द इयरमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला.
कोणत्या देशाच्या किती खेळाडूंना मिळाले स्थान…?
ऑस्ट्रेलियासाठी अॅडम झम्पा आणि भारतासाठी कुलदीप यादव या दोन फिरकी गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना स्थान मिळाले आहे. अशाप्रकारे ICC ODI संघात सर्वाधिक 6 भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी 2-2 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. न्यूझीलंडचा 1 खेळाडू स्थान मिळवू शकला.
ICC ODI टीम ऑफ द इयर 2023 …
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रॅव्हिस हेड, विराट कोहली, डॅरिल मिशेल, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), मार्को युनसेन, अॅडम झम्पा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.