ICC Men’s Test Team of the Year for 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2023 चा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. भारताच्या दोन खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला आयसीसीने 2023 च्या सर्वोत्तम कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. T20 प्रमाणेच पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला कसोटी संघात स्थान मिळालेले नाही.
ICC च्या 2023 च्या सर्वोत्कृष्ट कसोटी संघात ऑस्ट्रेलियाचे पाच, भारताचे दोन, इंग्लंडचे दोन, श्रीलंकेचा एक आणि न्यूझीलंडचा एक खेळाडू आहे. ICC ने 2023 च्या सर्वोत्तम कसोटी संघात भारताच्या रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनचा समावेश केला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा, मधल्या फळीतील फलंदाज ट्रॅव्हिस हेड, यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरी, वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना स्थान मिळाले आहे.
श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, इंग्लंडचा जो रूट आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचाही 2023 च्या सर्वोत्तम कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील पाच जणांचा या संघात समावेश आहे.
दरम्यान, दरवर्षी ICC तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम पुरुष आणि महिला संघ निवडते. जगभरातील 11 खेळाडूंना या संघांमध्ये स्थान मिळते. ICC ने 2023 चा सर्वोत्कृष्ट T20, सर्वोत्कृष्ट ODI आणि सर्वोत्कृष्ट कसोटी संघ जाहीर केला आहे.
The Men’s Test Team of the Year for 2023 consists of a host of classy performers headed by Australia’s courageous skipper 💥
Find out who made the cut 👇https://t.co/rPgPBOYSL9
— ICC (@ICC) January 23, 2024
ICC चा 2023 चा सर्वोत्तम कसोटी संघ – उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, केन विल्यमसन, जो रूट, ट्रॅव्हिस हेड, रवींद्र जडेजा, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), आर अश्विन, मिचेल स्टार्क आणि स्टुअर्ट ब्रॉड.
ICC चा 2023 चा सर्वोत्तम एकदिवसीय (ODI) संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रॅव्हिस हेड, विराट कोहली, डॅरिल मिशेल, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), मार्को युनसेन, अॅडम झम्पा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ICC चा 2023 चा सर्वोत्कृष्ट T20 संघ – यशस्वी जैस्वाल, फिल सॉल्ट, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क अडायर, रवी बिश्नोई, रिचर्ड नागरवा आणि अर्शदीप सिंग.