मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती ऍक्टिव्ह असते. सईने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती पारंपरिक वेषात दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये तिने कोल्हापुरी तडकादेखील लावला आहे.
View this post on Instagram
मराठीतील एक सुंदर अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते. सईने बिग बॉस मराठीमध्येसुद्धा सहभाग घेतला होता. बिग बॉस मराठीमुळेसुद्धा सईला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
View this post on Instagram
सई विविध व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते.
सध्या सई सोशल मीडियावरून चाहत्यांचं मनोरंजन करत असते. सईने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे.
View this post on Instagram
यामध्ये सईने वेस्टर्न लुकवर मराठमोळा तडका लावला आहे. सईने जीन्स आणि कुर्तीवर अस्सल मराठमोळी नथ आणि टिकली लावून सर्वांचंच लक्ष वेधून घेतले आहे. त्याचंबरोबर सईने ऑक्साईडचे दागिने आणि विशेष म्हणजे डोक्यावर पारंपरिक टोपी देखील घातली आहे. यासर्व गेटअप सह सई ‘इथून धक्का तिथून धक्का” गाण्यावर लिप्सिंग करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर असंख्य कमेंटस् येत असून अनेकांनी त्याला लाईक्स दिले आहेत.