औंध येथील समारंभात सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन
औंध – कधी जिजाऊ, कधी सावित्रीबाई फुले, कधी राणी लक्ष्मीबाई, कधी हिरकणी तर स्त्री कधी अहिल्यादेवी होळकर बनते…, अशा अनेक भूमिका जीवनात ती निभावत असते. शरद पवार साहेबांच्या धोरणांमुळे आज समाजातील सर्व क्षेत्रात स्त्रियांना समान हक्क आणि संधी निर्माण झाल्या आहेत, असे प्रतिपादन बारामती टेक्सस्टाइलच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्ष, प्रभाग क्र.9च्या वतीने बालेवाडी येथे हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी बालेवाडी परिसरातील सुमारे तीन हजार कुटूंबांना हळदी-कुंकूवाचे वान देण्यात आले. तर लकी ड्रॉ काढून 5 भाग्यवान महिलांना पैठणी देण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पुणे शहर अध्यक्षा स्वाती पोकळे, कोथरूड विधानसभा अध्यक्षा ज्योती सूर्यवंशी, माजी नगरसेविका व उपाध्यक्षा रोहिणी चिमटे, सरला चांदेरे, विमल बालवडकर, रुपाली बालवडकर, शिल्पा कळमकर, पुनम विधाते, प्रभाग क्र.9 राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुषमा ताम्हाणे, जान्हवी बालवडकर,भैरवनाथ ट्रस्टच्या विश्वस्त वर्षा विधाते, प्रभाग क्र.9 राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा प्राजक्ता ताम्हाणे तसेच महिला उपस्थित होत्या.