टूथब्रश विषयी टीप्स

इलेक्ट्रिक विरुद्ध हाताने ब्रश

दात सरळ आणि एकसमान नसतील, तर अनेकजण ठराविक उंचीचे ब्रिसल्स वापरतात. त्यामुळे दातांना स्वच्छ ठेवणे, तसेच वर्तुळाकार पद्धतीने ते घासण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर दात व हिरडय़ा तसेच त्यांच्या मधला भाग देखील स्वच्छ ठेवता येतो. दात घासण्याचा ब्रश हा दर तीन महिन्यांनी बदलला पाहिजे. नरम आकाराचे ब्रिसल्स हे दात व हिरडय़ांसाठी उपयुक्त आहेत. स्प्ले ब्रिसल्स वापरू नयेत, त्यामुळे तोंडावाटे जीवाणू जाण्याची प्रक्रिया प्रत्येक वेळी ब्रश करताना होऊ शकते.

ब्रशबरोबरच इतर सहाय्यक बाबी
दातांमध्ये अडकलेले अन्नकण दूर करण्यासाठी दात स्वच्छ घासले पाहिजेतच. पण, अनेकदा ते अन्नकण निघत नाहीत. अशावेळी फ्लॉसिंग किंवा प्लक अथवा फायबरच्या धाग्यांचा वापर केला जातो. अ‍ॅडल्ट डेंटल हेल्थ सव्‍‌र्हेच्या अभ्यासानुसार अफ्लॉसिंगच्या सहाय्याने दात स्वच्छ करण्याचे प्रमाण हे ३ व्यक्तींमध्ये एक असे आहे. याशिवाय दात स्वच्छ करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे वॉटरपिक या वॉटर जेट डिव्हाईसचा वापर करणे. (दंतवैद्यांकडे ही सामग्री असते), वॉटर फ्लॉसर्सचा उपयोग करणे असेही आहेत. त्यामुळे फ्लॉसिंगचा उपयोग ज्या भागात होऊ शकत नाही, तिथे दातांची स्वच्छता करणे सोपे होते. लाकडाच्या काडीने दात साफ करणे टाळा. त्यामुळे दातांमधील पोकळीत वाढ होऊ शकते. त्याचा नंतर त्रास देखील होतो. टूथ पिक हिरडय़ांना देखील नुकसान पोहोचवू शकते. त्यातून भविष्यात हिरडय़ांशी संबंधित व्याधी किंवा रोग होण्याची शक्यता असते.

इलेक्ट्रिक विरुद्ध हाताने ब्रश
इलेक्ट्रिक पद्धतीने ब्रशने दात साफ करण्यापेक्षा हाताने ब्रश करणे कधीही चागंले. जर आपल्याला कमी प्रमाणात दाब देऊन आणि किती वेळ दात घासायचे याचे तंत्र आत्मसात करता आले, तर नक्कीच हे कधीही चांगले.
वयस्कर किंवा दिव्यांग व्यक्ती पॉवर ब्रशचा उपयोग करतात, पण त्यांना हिरडय़ांमधील संवेदना थोडय़ा अधिक प्रमाणावर दातांवर दाब पडत असल्यामुळे जाणवतात. अनकेदा त्यामुळे काही प्रमाणावर दुखापत देखील होते. पॉवर ब्रशची एक कमतरता अशी आहे की, त्यामुळे खूप वेळ जातो. डोके आणि दात यांची वारंवार हालचाल करावी लागते. याउलट हाताने ब्रश करताना ३-४ मिनिटांचाच वेळ लागतो.

किती वेळा ब्रश करावा?
जुन्या शिकवणीनुसार जेवणानंतर ब्रश करावा. पण, अनेकदा ही बाब प्रत्यक्षात शक्य होत नाही. प्रत्येकालाच दरवेळी ब्रश करता येईल, अशी परिस्थिती नसते. आणि ती तितकी फायदेशीर देखील नाही.

त्या ऐवजी दिवसातून किमान दोन वेळा दोन मिनिटे तरी ब्रश करा. जर तुम्ही दिवसातून तीन वेळा ब्रश करणार असाल, तर ध्यानात ठेवा की काही खाल्ले किंवा प्यायले तर किमान एक तासाचे अंतर ठेवा आणि मगच ब्रश करा. तोपयर्ंत हिरडय़ा सामान्य अवस्थेत आलेल्या असतील. ज्यावेळी आपण काही खातो, त्यावेळी तोंडातील आम्लाची पातळी ही वाढलेली असते. ४० मिनिटांनंतर ती पूर्ववत होते. त्यामुळे हिरडय़ादेखील सामान्य अवस्थेत येतात. अशावेळी ब्रश करणे कधीही चांगले.

च्युईंगम हे देखील आम्लाचे उदासिनीकरण करण्यास सहकार्य करते. ब्रश करण्याच्या प्रक्रियेसारखे ते परिणाम देते. मात्र २० मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ च्युईंगम चघळला तर मात्र जबडय़ांना त्रास होतो. त्यातील स्नायू दुखू लागतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.