शेवगाव -करोना साथीच्या कठीण परिस्थितीत जिवाची बाजी लावुन काम करणाऱ्या, वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलिस दल, महसुल विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांना आज आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून फेस मास्क, हॅन्ड सॅनिटायझर, मास्क या सुरक्षा साहित्याचे व वैद्यकीय सामग्रीचे वितरण केले. तर शेवगांव ग्रामीण रूग्णालयासाठी ईसीजी मशीन देण्यात आले.
यावेळी आमदार राजळे यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात शेवगाव ग्रामीण रूग्णालय व बोधेगांव, तालुका आरोग्यअधिकारी यांचे कार्यालयीन कर्मचारी, महसुल विभाग, नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी, पोलिस स्टेशन यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील ढोरजळगांव, भातकुडगांव, दहिगांव ने, घोटण, चापडगांव, बोधेगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व या अंतर्गतचे उपकेंद्र मधील वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांना गर्दी टाळण्यासाठी त्यांच्या कार्यालयात हे साहित्य पोहच करण्यात आले.
यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. रामेश्वर काटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, कृषक समाजाचे राज्याध्यक्ष बापूसाहेब भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भागनाथ काटे आदी उपस्थित होते. त्यानंतर तहसील कार्यालयात आमदार मोनिका राजळे यांनी शेवगांव नगरपरिषद व ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक घेतली.
आमदार राजळे यांनी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वेळेत होणेसाठी उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापुसाहेब भोसले, बापुसाहेब पाटेकर, शहाराध्यक्ष रविंद्र सुरवसे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक कमलेश गांधी, गणेश कोरडे, अशोक आहुजा, सुनिल रासणे, शब्बीर शेख, विनोद मोहिते, नितीन दहिवाळकर, दिगांबर काथवटे, नितीन फुंदे, किरण काथवटे, नितीन मालानी, जलील राजे उपस्थित होते.