भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा एक टेनिस खेळतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरंतर महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी टेनिस कोर्टवर उतरले होते. यावेळी भारतीय दिग्गजांनी टेनिस खेळाचा आनंदही लुटला. महेंद्रसिंग धोनी आणि क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर यावेळी कॅज्युअल टी-शर्ट आणि ट्रॅक पँट घालून टेनिस खेळताना दिसले.
महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचे टेनिस खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दोन्ही माजी भारतीय खेळाडूंचे हे फोटो चाहत्यांना खूपच जास्त आवडले आहेत. कारण दोन दिग्गज खेळाडू क्रिकेट सोडून इतर खेळाच्या मैदानावर दिसल्यावर चर्चा तर होणारच. महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर हे क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहेत.
7️⃣ – 🔟
Set for some bottom hand drives! 🎾#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/TGqgDpGYfK— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 6, 2022
सचिन आणि धोनी यांना दोघांनाही क्रिकेट व्यतिरिक्त टेनिस खेळाची चांगली आवड आहे. अलीकडेच महेंद्रसिंग धोनी यूएस ओपन स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. काही दिवसांपूर्वी कपिल देव यांच्यासोबत गोल्फ खेळतानाचे एमएस धोनीचे फोटो समोर आले होते. त्याचबरोबर सचिन आताच रोड सेफ्टी लीगमध्ये क्रिकेट खेळला आहे. या लीगमध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया लिजेंड्स संघाने विजेतेपद पटकावले आहे.