Congress – निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेत बदल करण्याच्या प्रस्तावाला कॉंग्रेसने विरोध दर्शवला आहे. तो प्रस्ताव स्पर्धात्मक राजकारणाच्या तत्वाशी विसंगत असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
राजकीय पक्षांनी निवडणूक आश्वासनांविषयीच्या आर्थिक व्यवहार्यतेची माहिती मतदारांना द्यावी यासाठी आचारसंहितेत बदल करण्याचा आयोगाचा विचार आहे. मोफत खैराती, पोकळ आश्वासनांना लगाम घालण्याच्या दिशेने पाऊल म्हणून निवडणूक आयोगाच्या त्या प्रस्तावाकडे पाहिले जात आहे. मात्र, त्या प्रस्तावाला अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे. Congress
तशा पक्षांच्या यादीत आता कॉंग्रेसचीही भर पडली आहे. निवडणूक आयोगाच्या प्रस्तावावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाचे ते काम नाही. तो प्रस्ताव लोकशाहीला विनाशाकडे नेणारे आणखी एक पाऊल ठरेल. नोकरशाहीचा दृष्टीकोन बाळगल्यास सामाजिक विकासाच्या, कल्याणाच्या योजना वास्तवात येणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
धोरणात्मक घोषणांचे नियमन करण्याचे काम निवडणूक आयोगाचे नसल्याची भूमिका डाव्या पक्षांनी याआधीच मांडली आहे. निवडणूक आयोगाने संबंधित प्रस्तावावर राजकीय पक्षांकडून 19 ऑक्टोबरपर्यंत मत मागवले आहे. Congress