मुंबई – जागतिक क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शुक्रवारी आईचा आशीर्वाद घेत वाढदिवसाचा शुभारंभ केला. करोनामुळे हा 47 वा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे साजरा न करण्याचा निर्णय सचिनने घेतला होता. आयुष्यातील या महत्त्वाच्या दिवशी सचिनला त्याच्या आईने आशीर्वादाबरोबरच गणपती बाप्पाचा एक फोटो भेट म्हणून दिला.
Started my day by taking blessings from my Mother. 🙏🏼Sharing a photo of Ganpati Bappa that she gifted me.
Absolutely priceless. pic.twitter.com/3hybOR2w4d— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 24, 2020
आईने दिलेली सर्वात अनमोल भेट असे व्यक्त करत सचिनने करोनाबाबत देशवासियांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहनही ट्विटरवर केले आहे.