S.Jaishankar : कॅनडा आणि भारत यांच्यातील वाद आता आणखी चिघळत असल्याचे दिसत आहे. कारण काही दिवसापूर्वी खलिस्तानी नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे पोस्टर लावर त्यांना कॅनडाचे शत्रू असे या पोस्टर्सवर लिहिण्यात आले आहे. खलिस्तान्यांच्या या कृतीनंतर आता भारत सरकार अलर्ट मोड आल्याचे दिसत आहे. कारण सरकारकडून आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S.Jaishankar) यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी गट ‘शिख फॉर जस्टिस’कडून हे पोस्टर लावण्यात आले आहे. खलिस्तानच्या रूपाने (Supporters of Khalistan) वेगळ्या देशासाठी सार्वमत घेण्याची घोषणाही केली. ब्रिटीश कोलंबियातील सरे येथील त्याच गुरुद्वाराच्या बाहेर हे सर्व केले गेले, ज्याचा प्रमुख खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर होता. याच गुरुद्वाराबाहेर या वर्षी १८ जून रोजी निज्जर यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
खलिस्तानी दहशतवादी(Supporters of Khalistan) गुरुपतवंत सिंग पन्नूने भारताला धमकी दिली असतानाच कॅनडामध्ये पोस्टर्सचा खेळ सुरू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके यांना बुधवारी (11 ऑक्टोबर) साउथ ब्लॉकमध्ये बोलावून पोस्टर्सवर तीव्र आक्षेप व्यक्त केला.
कशी असते झेड श्रेणीची सुरक्षा?
परराष्ट्र मंत्री जयशंकर (S.Jaishankar) यांना सरकारने झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे. याचा अर्थ आता त्यांची सुरक्षा केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) व्हीआयपी सुरक्षा विभागाकडून केली जाईल. देशातील केवळ 176 लोकांना ही सुरक्षा मिळाली आहे. जयशंकर यांच्या सुरक्षेखाली 14 ते 15 सशस्त्र कमांडो असतील, जे त्यांच्याभोवती 24 तास उपस्थित असतील.