पुणे – पुनित बालन ग्रुप आयोजित तिसऱ्या एस. बालन टी-20 लीग अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत गेमचेंजर्स इलेव्हन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी या संघांनी सगल तिसऱ्या विजयाची नोंद केली.
मुंढवा येथील लिजंड्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत गेमचेंजर्स इलेव्हन संघाने गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमी संघाचा 180 धावांनी धुवा उडविला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना गेमचेंजर्स इलेव्हन संघाने 236 धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाला उत्तर देताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमीचा डाव 56 धावांवर गुंडाळला गेला.
दुसऱ्या सामन्यात केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्स संघाचा 90 धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला.
केदार जाधव संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 218 धावांचे आव्हान उभे केले. या धावांचा पाठलाग करताना क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्स संघाचा डाव 128 धावांवर मर्यादित राहिला.
संक्षिप्त धावफलक
गटसाखळी फेरी : 1) गेमचेंजर्स इलेव्हन : 20 षटकांत 8 बाद 236 धावा. (तुशार श्रीवास्तव 79, नौशाद शेख 47, आदिल अन्सारी 33, अर्थव स्वामी 2-31) वि. वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमी ः 13.3 षटकात सर्वबाद 56 धावा. (शुभम चव्हाण 10, नौशाद शेख 4-10, प्रज्वल गौंड 3-11). सामनावीर ः नौशाद शेख.
2) केदार जाधव क्रिकेट अकादमी : 19 षटकात 4 बाद 218 धावा. (विशाल भिलारे नाबाद 112, आकाश पाटील 56, दर्शन दातीर 2-37) वि. वि. क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्स ः 19 षटकात 8 बाद 128 धावा. (सलमान सय्यद नाबाद 58, अक्षय चव्हाण 2-18, तेजस रोडे 2-10). सामनावीर ः विशाल भिलारे.