पुणे – पुनित बालन ग्रुप आयोजित तिसऱ्या एस. बालन टी-20 लीग अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप आणि एमईएस इलेव्हन या संघांनी आगेकूच कायम राखली. मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत एमईएस इलेव्हन संघाने विझार्डस् इलेव्हन संघाचा 110 धावांनी धुव्वा उडवित सलग विजय नोंदविला. एमईएस इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 207 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाला उत्तर देताना विझार्डस् इलेव्हन संघाचा डाव 97 धावांवर आटोपला.
पुनित बालन ग्रुप संघाने एसके डॉमिनेटर्स इलेव्हन संघाचा 8 गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसके डॉमिनेटर्स इलेव्हन संघाने 121 धावांचे आव्हान उभे केले. पुनित बालन ग्रुप संघाने हे आव्हान 14 षटकात व 2 गडी गमावून पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक (गटसाखळी फेरी) –
1) एमईएस इलेव्हन : 20 षटकात 5 बाद 207 धावा. (सुजित उबाळे नाबाद 94, हर्ष संघवी 64, रत्नदीप लोंढे 1-24) वि. वि. विझार्डस् इलेव्हन ः 16 षटकात 9 बाद 97 धावा. (रत्नदीप लोंढे 29, आदित्य गजभिये 21, गौरव जोशी 3-21). सामनावीर ः सुजित उबाळे.
2) एसके डॉमिनेटर्स इलेव्हन : 19.5 षटकात सर्वबाद 121 धावा. (राकेश मते 21, अक्षय पंचारीया 18, शिवम ठोंबरे 18, अक्षय दरेकर 2-9, पुनित बालन 2-30, उमर शहा 2-16) पराभूत वि. पुनित बालन ग्रुप ः 14 षटकात 2 बाद 122 धावा. (श्रीकांत मुंडे नाबाद 72, हृषीकेश मोटकर 41, महेश वाघिरे 2-24). सामनावीर ः श्रीकांत मुंडे.