मॉस्को – रशियातील सर्वात प्रभावशाली नेते अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या आलिशान निवासस्थानाची छायाचित्रे नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या निवासस्थानाची किंमत तब्बल साडेसात हजार कोटी रुपये असून या महालामध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
पुतीन यांचे रशियातील कट्टर विरोधक अलेक्सि नवेलनी यांनी ही छायाचित्रे प्रसिद्ध केली असून या आलिशान महालाच्या निमित्ताने पुतीन यांच्यावर निशाणा साधला आहे. या महालामध्ये पुतीन यांच्या मनोरंजनासाठी पोल डान्स हॉल स्ट्रिप टिझ हॉल आणि हुक्का लाऊंज यासारख्या सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
तब्बल 16 मजल्यांचा हा आलिशान राजमहाल समुद्राच्या समोर असून डिस्को आणि कॅसिनो यासारख्या अत्याधुनिक सोयी करण्यात आल्या आहेत. हा महाल सोळा मजल्यांचा असला तरी त्यापैकी बहुतेक मजले हे भूमिगत आहेत त्यामुळे जमिनीच्या वर दिसणारे मजले खूपच कमी आहेत ब्रिटिश गुप्तहेर जेम्स बॉण्ड यांच्या एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचा हा महाल आहे.
नवेलनी यांनी जेव्हा या महालाची छायाचित्रे प्रसिद्ध केली तेव्हा हा महाल आपला नसून आपले एक अब्जाधीश मित्र यांचा असल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे. पण या महालामध्ये ठिकठिकाणी असलेली गरुडाची चित्रे पाहता हा महाल अधिकृतपणे पुतीन यांचा असल्याचे स्पष्ट होते.
पुतिन यांच्यावर टीका करणारे आले अलेक्सि नवेलनी गेले काही वर्ष नजर कैदेत असून पुतीन यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. रशियातील भ्रष्टाचारावर त्यांनी नेहमीच टीका केली असून याच माध्यमातून पुतीन यांनी मोठी संपत्ती जमवली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.