मॉस्को – युक्रेनबरोबर चर्चा करण्याची आपली सशर्त तयारी असल्याचे रशियाचे अध्यक्ष लादिमिर पुतीन यांनी म्हटले आहे. युद्धादरम्यान युक्रेनच्या जेवढ्या भागावर रशियाने ताबा मिळवला आहे, तेवढा जर रशियाला देण्यास युक्रेनची तयारी असेल, तर आपण युक्रेनबरोबर चर्चेला तयार आहोत, असे पुतीन यांनी तुर्कीचे अध्यक्ष रेसिप तय्यिप इर्दोगन यांना कळवले आहे.
इर्दोगन यांनी रशिया-युक्रेनदरम्यानचे युद्ध समाप्त करण्यासाठी पुढाकार घेतला असून पुतीन यांच्याशी याबाबत चर्चाही केली आहे. रशियाने युक्रेनच्या पुर्वेकडील आणि दक्षिणेकडील मोठ्या भूभागावर ताबा मिळवला आहे.
डोनेत्सक, लुहान्सक, झापुरिझ्झया आणि खेरसोन हे भाग सार्वमत घेऊन रशियाला जोडण्यात आले आहेत. या भागांवर रशियाचे पूर्ण नियंत्रण देखील प्रस्थापित झालेले नाही. तरी रशियाने ते भाग काबीज केले असल्याचे जाहीर केले आहे.
Pakistan : बाजवा यांना माझी हत्या करायची होती; इम्रान खान यांचा आरोप
पुतीन आणि इर्दोगन यांनी धान्य वितरणाला सहाय्य करण्याच्या कराराबाबतही चर्चा झाली. या करारानुसार रशियातील धान्य आणि खतांच्या निर्यातीला पाश्चात्य देशांनी परवानगी द्यावी, अशी मागणीही पुतीन यांनी केली आहे.