किव्ह – रशियानं युक्रेनच्या उत्तर भागात सुमारे ६०० रॉकेट मारा केला आहे. युक्रेनच्या दक्षिण भागातल्या खेरसोन भागात हा मारा केला गेला. दरम्यान, युक्रेन मध्ये काल हॅकर्सनं सायबर हल्ला केला असून सर्व प्राथमिक सेवांसह अनेक महत्वाच्या सेवा बाधित झाल्याचे युक्रेनच्या सर्वात मोठ्या प्रसार माध्यम संस्थेने सांगितले.
त्याचप्रमाणे रशियाच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या युक्रेनी नागरिकांची माहिती न मिळाल्यानं स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरल्याची माहिती संस्थेने दिली आहे. या संस्थेद्वारे सुमारे २४ लाखांपेक्षा अधिक मोबाईल धारकांना सेवा पुरवली जाते.