India Women vs England Women Test Live Telecast : नुकतीच भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका संपली. इंग्लंडने ही मालिका 2-1 ने जिंकली. आता दोन्ही संघ एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून नवी मुंबईत ही लढत होणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघ तब्बल नऊ वर्षांनी घरच्या भूमीवर कसोटी खेळणार आहे. भारताने यापूर्वी नोव्हेंबर 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. भारत विरुद्ध इंग्लंड महिला कसोटी सामन्याच्या लाइव्ह स्ट्रीमिंगशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया….
सामना कधी खेळला जाईल?
गुरुवारपासून (१४ डिसेंबर) भारत आणि इंग्लंड महिला संघात कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
सामना कुठे खेळला जाईल?
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड महिला कसोटी खेळली जाणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध इंग्लंड महिला कसोटी सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होईल.
सामना कोठे पाहता येईल ?
तुम्ही Sports18 – 1 (SD + HD) चॅनलवर टीव्हीवर भारत विरुद्ध इंग्लंड महिला कसोटी सामना पाहू शकाल.
सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पहावे?
तुम्ही जिओ सिनेमावर भारत विरुद्ध इंग्लंड महिला कसोटी सामन्याचा ऑनलाइन तेही मोफत आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर या सामन्याशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या तुम्ही प्रभातच्या वेबसाईटवर देखील वाचू शकता.
भारताचा कसोटी संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार, सायका इशाक, रेणुका ठाकूर, तीतस साधू, मेघना सिंग.
इंग्लंडचा कसोटी संघ : हीदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), बेस हीथ (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनी व्याट, टॅमी ब्युमॉन्ट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, सोफी एक्लेस्टोन, केट क्रॉस, कर्स्टी गॉर्डन, लॉरेन फाइलर , एम्मा लॅम्ब, चार्ली डीन, लॉरेन बेल.