लॉकडाऊन उघडण्यास रशिया, ब्रिटनला अडचण

रोम : युरोपापासून आशिया खंडापर्यंत करोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन उघडण्यसाठी अनेक देशांकडून जोरदार तयारी सुरू झालेली आहे. मात्र ब्रिटन आणि रशियामध्ये अद्याप लॉकडाऊन उघडण्यासाठी सोयीचे वातावरण नाही. त्यामुळे या देशांनी लॉकडाऊन उघडण्याबाबतचा आपला विचार तुर्तास पुढे ढकलला आहे. रशियामध्ये रविवारी 10 हजार 633 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे इतर देशांमधून आपल्या देशामध्ये संसर्ग पसरू नये, म्हणून ही काळजी घेण्यात येत आहे.

ब्रिटन आणि रशियामध्ये रुग्णांची संख्या आणि मृत्यूची आकडेवारी दिवसेंदिवस वाढायला लागली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव मार्ग असल्याने सध्या तरी लॉकडाऊन उठवणे शक्‍य नसल्याचे संकेत या देशांनी दिले आहेत. रविवारी भारतामध्ये 2,600 हून अधिक संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. तर रशियामध्ये एकाच दिवसात सापडनाऱ्या रुग्णांची संख्या 10 हजारांपेक्षाही अधिक झाली आहे.

ब्रिटनमधील रुग्णांची संख्या इटलीच्या जवळपास पोचली आहे. ब्रिटनमधील रुग्ण तुलनेने तरुण आहेत. करोनाचा मुकाबला करण्यासाठी इटलीपेक्षा ब्रिटनला अधिक कालावधी मिळाला आहे. याच प्रमाणे अफगाणिस्तानातील स्थितीही काळजी करावी, अशी आहे. तेथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढायला लागते आहे.

चीनमध्ये आता केवळ एकच रुग्ण असल्याचे कालच समोर आले आहे. त्यामुळे तेथील निर्बंध आता हळूहळू उठवले जाऊ लागले आहेत. लॉकडाऊन उठवण्याची मोठी मागणी अमेरिकत होते आहे. तेथे तर लॉकडाऊनचे समर्थन करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. रिपब्लिकन बहुसंख्य असलेल्या सिनेटचे कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे. तर डेमोक्रॅटिकचे वर्चस्व असलेल्या प्रतिनिधीगृहाचे काम अजून सुरू झालेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.