मेष : महत्त्वाच्या ग्रहांची साथ लाभेल. बोलण्यातून विशेष लाभ होतील. व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी ठोस पावले उचलाल. नशिबाची साथं मिळेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी महत्त्वाची कामे सोपवतील. जादा सवलती व अधिकारही देतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांना अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. कौतुकास पात्र कामं हातून घडेल.
वृषभ : महत्त्वाची कामे हाती घेऊन पूर्ण कराल. पैशाची चिंता मिटेल. व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तींची केलेली निवड (कामासाठी) फायदेशीर ठरेल. उलाढाल वाढेल. नोकरीत कार्यतत्पर रहाल. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. महिलांना केलेल्या कामाचा आनंद मिळेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. सुवार्ता कळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
मिथुन : स्वप्ने साकार होतील. अनेपक्षित लाभाची शक्यता. व्यवसायात ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. जुनी येणी वसूल झाल्याने चार पैसे हातात राहतील. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. मनाप्रमाणे कामे करता येतील. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. नवीन खरेदी कराल.
कर्क : मनात विचारांचा काहूर माजला असेल तर योग्य व निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. मगच कृती करा. व्यवसायात आधुनिकीकरण करून विस्तार करण्याचे बेत असतील. पैशाची कुवत ओळखून कामाची आखणी करा. नोकरीत अविचाराने वागून त्रास व संकटे ओढवून घेऊ नका. पैशाच्या हव्यासापायी कुसंगत टाळा. मनाविरुद्ध वागावे लागले तरी चिडू नका. “मौनं सर्वाथ साधनम्’ हे लक्षात ठेवावे.
सिंह : साहस व धडाडी राहील. कामांना गती देण्यासाठी तत्पर रहाल. व्यवसायात कामाचा उरक दांडगा असेल. हितचिंतक मदत करतील. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. बेकार व्यक्तींना कामधंदा मिळेल. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढत नाहीत याची खात्री करा. तुमच्या मागण्या मूड पाहून मांडा व मान्य करून घ्या. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल.
कन्या : अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात घेतलेले निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे स्वत: करून इतर कामे गोड बोलून सहकाऱ्यांकडून करून घ्याल. नवीन कामाची संधी मिळेल. बढतीचे योग येतील. महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी. अविश्वास न दाखवता कामे इतर व्यक्तींवर सोपवावीत. हलके कान न ठेवता प्रत्यक्ष शहानिशा करावी.
तुळ : सकारात्मक दृष्टिकोन राहील. नवीन कामे मिळण्यासाठी प्रयत्न कराल. व्यवसायात तांत्रिक अडथळ्यांवर मात करून उलाढाल वाढवाल. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. अर्धवट कामे मार्गी लागतील. नोकरीत कामाचा उरक दांडगा राहील. सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. गैरसमज मात्र टाळा. महिलांनी स्पष्टवक्तेपणा टाळावा.
वृश्चिक : “आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे वागाल. अशक्य वाटणाऱ्या कामात यश संपादन कराल. तडजोडीचे धोरण स्वीकारून फायदा करून घ्याल. नोकरीत अहंपणा सोडून सहकाऱ्यांना मदत करा. कामातील बेत गुप्त ठेवा. तुमच्या वागण्याबोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. स्वत:चेच म्हणणे खरे करण्याचा अट्टहास धरू नका. इतरांनाही विचारात घ्या.
धनु : आशा निराशेचे मधूनच तुम्हाला झटके येतात तरी आशावादी राहून कामे हाती घ्या. एखादी चांगली बातमी मन प्रसन्न करेल. व्यवसायात उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून कृती कराल. नोकरीत नवीन अनुभव येतील. अतिविश्वास टाळा. मैत्री व व्यवहार यात गल्लत करू नका. गुप्त शत्रूंपासून सावध रहा. महिलांना कामात झालेली दिरंगाई सहन होणार नाही. त्यामुळे चिडचिड होईल. जुने आजार डोके वर काढतील. वेळीच औषधोपचार करा.
मकर : ग्रहमानाची साथं आहेच तरी निर्धाराने कामाला लागा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे हाती घ्याल. व्यवसायात प्रत्येक कामात यश संपादन कराल. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने मनासारखे खर्च करू शकाल. नोकरीत सरकारी कामे गती घेतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील. कामामुळे दगदग वाढेल. विश्रांती घ्यावीशी वाटेल. सभोवतालच्या व्यक्तीबाबत नवीन अनुभव येतील. खेळाडूंना कष्टाचे फळ चांगले मिळेल.
कुंभ : अत्यंत धोरणी राहून प्रत्येक कृती कराल. व्यवसायात कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक ठेवाल. कामात चोखंदळ राहाल. नोकरीत तुमची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामातील बेत गुप्त ठेवा. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. घरात सहनशीलता बाळगून कामे करावीत. आरोग्यास जपावे. कलावंत, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना कामात स्पृहणीय यश मिळेल.
मीन : काळाबरोबर राहून बदल केलात तर व्यवसायात यश संपादू शकाल. व्यवसायात सुसंवाद साधून कामे करण्यावर भर राहील. नवीन ओळखीचा चांगला उपयोग होईल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत अधिकाराचा योग्य वापर कराल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. प्रवासयोग संभवतो. घरात महिलांना मन:स्वास्थ्य जपता येईल. नवीन खरेदीचा मोह होईल. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल.