पुणे – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ‘रुपाली चाकणकर’ यांचा मुलगा ‘सोहम चाकणकर’ लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. सोहम ‘विरजण’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो रोमँटिक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले. आता या चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झाले आहे. विरजण या मराठी चित्रपटातील “देवा सांग ना” हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेंनी हे गाणं गायलं आहे.
रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. “आज सोहमच्या ‘विरजण’ या चित्रपटातील “देवा सांग ना” हे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे गायक आदर्श शिंदे यांनी गायले आहे,” असं चाकणकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.