मुंबई – अभिनेता आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत राहिले आहे. आतापर्यंत आमिरचे दोनदा लग्न झाले आहे. आमिरचा आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यानंतर आता आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून त्याचे नाव दंगल गर्ल फातिमा सना शेखसोबत जोडले जात आहे.
आमिर आणि फातिमाचा काही दिवसांपूर्वी पिकलबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमिर हा फातिमाला डेट करत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
View this post on Instagram
तर अभिनेता केआरकेने देखील फातिमा आणि आमिरबद्दल एक ट्वीट करत लिहिले की, “आमिर खान आता त्याच्या मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखसोबत लग्न करणार आहे. ‘दंगल’ या सिनेमात दोघांनी एकत्र काम केले होते.” मात्र अद्याप फातिमा आणि आमिर यांच्याकडून त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Breaking News:- Aamir Khan is going to get married with his daughter’s age Fatima Sana Shaikh soon. Aamir Khan is dating Sana from the time of their film #Dangal.
— KRK (@kamaalrkhan) May 25, 2023
दररम्यान, आमिरचे 1986 मध्ये रीना दत्तासोबत लग्न झाले होते. 2002 मध्ये रीनासोबत त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर आमिरने 2005 मध्ये किरण रावसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये आमिर आणि किरण हे विभक्त झाले. आता आमिरचे नाव फातिमा सना शेखसोबत जोडले जात आहे. मागील वर्षी आमिर खानची मुलगी आयरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला आहे.