लोणंदमध्ये “रन फॉर हेल्थ मॅरेथॉन’ उत्साहात 

डॉक्‍टर्स, मेडिकल व्यावसायिकांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग

लोणंद  – लोणंद मेडिकल असोसिएशनतर्फे डॉक्‍टर्स डे निमित्ताने रविवारी “रन फॉर हेल्थ मॅरेथॉन’ स्पर्धा तसेच नगरपंचायत सफाई कामगारांना आरोग्य किटचे वाटप व शरदचंद्र पवार महाविद्यालयात वृक्षारोपण असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी सहा वाजता रन फॉर हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेला नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. त्यापूर्वी नगराध्यक्षांच्या व ज्येष्ठ डॉक्‍टर किशोर बुटियानी, अनिलराजे निंबाळकर, जयेश रावळ, अनघा दानी आदींच्या हस्ते सफाई कामगारांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. “रन फॉर हेल्थ’ मॅरेथॉन स्पर्धेत डॉक्‍टर्स, केमिस्ट व लॅब असोसिएशनच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला. मॅरेथॉन संपल्यानंतर एस. पी. कॉलेज येथे सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि. संतोष चौधरी उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभामध्ये स्वागत व प्रास्ताविकमध्ये लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्‍टर मिलिंद काकडे यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच “रन फॉर हेल्थ’ मॅरेथॉनची संकल्पना सांगितली.

मिलिंद काकडे म्हणाले, बदलत्या जीवनशैली मुळे होणारे आजार वाढत आहेत. म्हणून उत्तम आरोग्यासाठी पळा ! हा संदेश समाजापर्यंत पोचणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणंद येथील ज्येष्ठ डॉ. वर्धमाने होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून एस. पी. कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्‍टर सावंत उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मॅरेथॉनमधील प्रथम तीन विजेत्या पुरुष व महिला डॉक्‍टरांच्या सत्कार करण्यात आला.

पुरुषांमध्ये डॉ. सचिन भोईटे प्रथम, डॉ. गणेश मस्के द्वितीय, डॉ. संजीव पवार तृतीय तर महिलांमध्ये डॉ. स्वप्नाली डोंबाळे प्रथम, डॉ. स्मिता शिंदे द्वितीय, डॉ. अर्पणा म्हस्के तृतीय यांना पारितोषिक मिळाले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी लोणंद मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिलराजे निंबाळकर, डॉ. अविनाश शिर्के, डॉ. कचरे, डॉ. डोंबाळे, डॉ. श्री व सौ. रावखंडे, डॉ. ज्योती काकडे, डॉ. मनीषा काकडे, डॉ. नेहा घोडके, डॉ. आरती साळुंखे, डॉ. श्री व सौ. राजकुमार निकम, डॉ. स्मिता पवार, डॉ. देवदत्त राऊत, डॉ. मनोज निकम, डॉ. सोनाली गोरड आदी उपस्थित होते.

तसेच केमिस्ट असोसिएशनचे अजित भोईटे, संतोष काकडे, मंगेश रनवरे, जावेद पटेल, जाधव तर लॅब असोसिएशनचे धनंजय कापसे, राजू शेळके, वैभव घोरपडे, प्राजक्ता क्षीरसागर, यादव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप येळे यांनी केले तर आभार डॉ. गणेश दानी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राहुल क्षीरसागर, डॉ. अवधूत किकले, डॉ. सचिन धायगुडे, डॉ. बुटियानी, डॉ. किशोर शिंदे यांनी मेहनत घेतली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)