सातारा – गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसानंतर निसर्गाचे रूप चांगलेच खुलले आहे. डोंगरपरिसर हिरवाईने नटले आहे. सध्या पावसाळा सुरू असला तरी आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने पहाटेच्यावेळी सातारा शहर असे धुक्यात हरवून जात आहे.
सोमवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ढगांचे पांघरुण बाजूला करत डोंगराआडून बाहेर येणारा सूर्य आणि धुक्यात हरवलेल्या साताऱ्याचे हे देखणं रूप कॅमेराबद्ध केले आहे छायाचित्रकार नेहा जाधव यांनी. मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.