मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही या मालिकेने इतर मालिका व कार्यक्रमांना चांगली टक्कर दिली होती. या मालिकेतील नात्यांचा त्रिकोण प्रेक्षकांच्या काळजाला चांगला भिडला होता. सध्या ही मालिका बंद झाली असली तरी, मालिकेतील प्रत्येक कलाकार आज देखील रसिकांच्या मानत आपलं स्थान निर्माण करून आहे.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ‘माया’ ही व्यक्तिरेखा साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ‘रूचिरा जाधव’ नेहमी तिच्या लुकमुळे चर्चेत असते. फॅन्स देखील तिच्या बोल्ड आणि हॉट लूकवर फिदा होत असतात. रुचिरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय झाली आहे.
नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर योगा करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यावेळी तिने ब्रालेट आणि शॉर्ट पँट परिधान केल्याचं दिसून येत आहे. मात्र, या पँटवरुन एका व्यक्तीने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण रुचिरानेही त्याला स्पष्ट शब्दात उत्तर देत सुनावले आहे.
View this post on Instagram
रुचिराच्या या पोस्टवर एका नेटकाऱ्यानं किती वर्षापासून तुम्ही हीच शॉर्ट पँट घालत आहात?’ असा प्रश्न विचारला आहे. त्यावर रुचिरा उत्तर देत म्हणाली, “कदाचित गेल्या 1 वर्षापासून मी ही पँट परिधान करत आहे. पण मी पुढच्या किमान 20 वर्षांसाठी ती पँट परिधान करु शकेन, याची मला खात्री आहे.
कारण मला ती तेव्हाही योग्यरित्या होईल. ही सर्व पॉवर योगाची कमाल आहे. तुम्हीही एकदा अनुभव घ्या. एक आरोग्यदायी सल्ला देते, तुम्हीही योगाभ्यास करा..’ असं रुचिरा म्हणाली. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सगळीकडे चांगलचीच व्हायरल होत आहे.