“बिग बॉस-14’ची विजेती रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती चाहत्यांशी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. परंतु आता रुबिना दिलैकने केलेल्या एका अतरंगी फोटोशूटमुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.
View this post on Instagram
रुबीनाने आपल्या फोटोशूटमधून काहिसे वेगळेपण दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सोशल मीडियावर यूजर्सकडून तिला ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान, रुबीनाने एका ग्रीन आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. यासोबतच तिने डोक्यावर काही फुलांची स्टाइल केली आहे.
View this post on Instagram
ही स्टाइल काही चाहत्यांना वाढली आहे, तर काही चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे. यापूर्वीही रुबीनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये दिलकश अंदाजात दिसली होती.
View this post on Instagram
दरम्यान, “बिग बॉस-14’नंतर ती पुन्हा एकदा “शक्ती’ या मालिकेत काम करत आहे. सध्या या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे.
View this post on Instagram