दुबई – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सामना होत आहे. या दोन्ही संघात पॉवर हिटर्स फलंदाज असल्याने हा सामना याच पॉवर हिटर्समध्ये रंगणार आहे.
बेंगळुरू आणि दिल्ली यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(टाॅस) कौल हा बेंगळुरूच्या बाजूने लागला आहे. बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना दिल्ली कॅपिटल्स संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
#RCB have won the toss and they will bowl first against #DC in Match 19 of #Dream11IPL.#RCBvDC pic.twitter.com/a63o1mUDja
— IndianPremierLeague (@IPL) October 5, 2020
दरम्यान, बेंगळुरू आणि दिल्ली याच्यांत होणारा आयपीएल स्पर्धेतील हा 19 वा सामना असून दोन्ही संघाने 4 सामने खेळले आहेत. यामध्ये दोन्ही संघाने 3 विजय मिळवले आहेत तर दोघांचा एकदा पराभव देखील झाला आहे. दोन्ही संघांचे बलाबल पाहिले तर त्यात दिल्ली जास्त भक्कम वाटत असली तरीही बेंगळुरूकडून त्यांना धक्का देखील बसू शकतो.