#SRHvRCB Qualifier 2 : हैदराबादसमोर बेंगळुरूची शरणागती

हैदराबादला विजयासाठी 132 धावांचं आव्हान

आबूधाबी :- एबी डीविलियर्स आणि ऍरन फिंच वगळता कर्णधार विराट कोहलीसह अन्य प्रमुख फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा डाव सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटरमधील महत्वाच्या सामन्यात 20 षटकांत 7 बाद 131 धावांवर रोखला गेला. 

या अत्यंत महत्वाच्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीला मदत करत असलेल्या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय जेसन होल्डरसह अन्य गोलंदाजांनी सार्थ ठरवला.

होल्डरने सामन्याच्या दुसऱ्याच षटकांर बेंगळुरूचा कर्णधार कोहलीला बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर त्याने यंदाच्या स्पर्धेतील भरात असलेला फलंदाज देवदत्त पडीक्कललाही बाद करत मोठा अडसर दूर केला. त्यानंतर 30 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 32 धावांची खेळी केलेल्या फिंचला शाहबाज नदीमने तंबूचा रस्ता दाखवला.

मात्र, दुसऱ्या बाजूला डीविलियर्स अत्यंत आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने संघाचा डावसावरण्याचा प्रयत्न करताना शानदार अर्धशतकी खेळी केली. मोईन अली, शिवम दुबे व वॉशिंग्टन सुंदर यांनी साफ निराशा केली. दुसरीकडे डीविलियर्सने 43 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली.

हा सामना हरणारा संघ स्पर्धेतून बाहेर जाणार असून विजय प्राप्त केलेल्या संघाला दुसऱ्या क्वालिफायरचा सामना खेळत अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची संधी मिळणार आहे.

टी. नटराजनने त्याला माद करत हैदराबादला दिलासा दिला. त्यानंतर बेंगळुरूचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. तळात नवदीप सैनी व महंमद सिराज यांनी थोडीफार लढत देताना संघाला 20 षटकांत 7 बाद 131 अशी मजल मारुन दिली.  हैदराबादकडून जेसन होल्डरने 3 गडी बाद केले. नटराजनने 2 बळी घेतले तर, शाहबाज नदीमने 1 गडी बाद केला. 

संक्षिप्त धावफलक – रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 7 बाद 131 धावा. ( एबी डीविलियर्स 55, ऍरन फिंच 32, महंमद सिराज नाबाद 10, नवदीप सैनी नाबाद 9, जेसन होल्डर 3-25, टी. नटराजन 2-33, शाहबाज नदीम 1-30).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.