IPL 2024, Live Cricket Score (DC vs SRH Match 35) : आज आयपीएल 2024 च्या 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात चांगली कामगिरी करून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याकडे दिल्ली आणि हैदराबादचे लक्ष असेल.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादने तुफानी सुरुवात केली आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने दिल्लीच्या गोलंदाजांची यथेच्छ धूलाई करून इतिहास रचला आहे. हैदराबादने पॉवर प्ले मध्ये आयपीएल इतिहासातील सर्वोच्च स्कोअर केला आहे.
सलामीच्या जोडीने अवघ्या 6 षटकांत धावफलकावर 125 धावा लावल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा पॉवर प्ले स्कोअर ठरला आहे. तसेच टी-20 क्रिकेटमधली सुध्दा ही सर्वोच्च पॉवरप्ले धावसंख्या ठरली आहे. पॉवरप्लेमध्ये आजपर्यंत जगातील कोणत्याही संघाने एवढी मोठी धावसंख्या उभारलेली नाही.
125 runs. 6 overs 🚀
Highest powerplay total of all time! 🔥
Travis Head 🤝 Abhishek Sharma
Follow the Match ▶️ https://t.co/LZmP9Tevto#TATAIPL | #DCvSRH
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024
यादरम्यान पॉवरप्लेमध्ये ट्रॅव्हिस हेडने 84 आणि अभिषेक शर्माने 40 धावा केल्या. यापूर्वी, आयपीएल स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये सर्वोच्च धावसंख्या केकेआरच्या नावावर होती, ज्याने 2017 मध्ये आरसीबीविरुद्ध कोणतेही नुकसान न करता 105 धावा केल्या होत्या.
T20 पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या
1. सनरायझर्स हैदराबाद – 125/0 वि दिल्ली कॅपिटल्स, 2024
2. नॉटिंगहॅमशायर – 106/0 वि डरहम, 2017
3. कोलकाता नाइट रायडर्स – 105/0 वि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 2017
4. सेंट किट्स एंड नेविस पैट्रियट्स – 105/0 वि बारबाडोस ट्राइडेंट्स, 2017
5. दक्षिण आफ्रिका – 102/0 वि वेस्ट इंडीज, 2023