Live Cricket Score, RCB vs SRH, Indian Premier League 2024 : आज आयपीएलच्या 30व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आरसीबीच्या होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादने ( Sunrisers Hyderabad ) त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकले आहेत आणि त्यांची नजर विजयाची हॅट्ट्रिक करण्यावर असेल, तर या हंगामात खराब फॉर्ममध्ये असलेल्या (Royal Challengers Bengaluru) आरसीबीचे विजयी पुनरागमनाकडे लक्ष असेल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा ( Toss update ) कौल हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या बाजूनं लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार फाफ डुप्लेसिसने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨
Royal Challengers Bengaluru have elected to bowl against Sunrisers Hyderabad.
Follow the Match ▶️ https://t.co/OOJP7G9bLr#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/sJyCNEU0Lx
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2024
आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये 6 पैकी 5 सामने गमावले आहेत आणि फक्त 1 सामना जिंकला आहे. यासह, ते 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद ने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहेत.
IPL 2024 : एका IPL सामन्यातून चीअरलीडर्स किती कमावतात ? तुम्हालाही जाणून वाटेल आश्चर्य….
दरम्यान, RCB आणि SRH आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 23 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत सनरायझर्स हैदराबादने 12 वेळा आरसीबीचा पराभव केला आहे. तर, RCB ने एकूण 10 सामन्यांमध्ये SRH चा पराभव केला आहे. दोन्ही संघांमधील एक सामनाही अनिर्णित राहिला आहे. हैदराबादने RCB विरुद्ध सर्वाधिक 231 धावा केल्या आहेत. तर, आरसीबीने SRH विरुद्ध सर्वाधिक 227 धावा केल्या आहेत.