बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने सिनेकामगारांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. “खतरों के खिलाडी’ला होस्ट केलेल्या रोहितने या रिऍलिटी टीव्ही शोमधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ठराविक रक्कम ही ज्युनियर कलाकार, बॅकग्राऊंड डान्सर, स्टंटमॅन, लाइटमॅन आणि कामगारांना मदत करणार आहे. हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे “खतरों के खिलाडी ः मेड इन इंडिया’च्या विशेष शोचे रविवारपासून शूटिंग सुरू करण्यात आले आहे. परदेशात चित्रीकरण केलेल्या मागील सिझननंतर आता या सिझनचे संपूर्ण शूटिंग मुंबईत होणार आहे. या हंगामात मागील मोसमातील चॅम्पियन्ससुद्धा झळकणार आहेत.
इंडिया ऍडिशनच्या स्पर्धकांमध्ये करण वाही, रित्विक धनजानी, हर्ष लिंबाचिया, रश्मी देसाई, निया शर्मा, जॅस्मीन भसीन, ऐली गोनी आणि जय भानुशाली यांचा समावेश आहे.
दरम्यान, करोना साथीत शेट्टीने एफडब्ल्यूईसी आणि लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या छायाचित्रकारांना मदत
केली होती.