नवी दिल्ली – हिटमॅन रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्यासह महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू यांच्या नावाची क्रीडा क्षेत्रातील भारतरत्न समजल्या जात असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
रोहितला हा पुरस्कार मिळाला तर हा पुरस्कार पटकावणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत या चार जणांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.