बारामती – बारामती शहर व तालुक्यात नव्याने 20 करोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृत्यूची संख्या 24 वर पोहोचली आहे.
बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील 6 असे 20 जणांची ऍन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यामुळे बारामतीतील रुग्णसंख्या 438 झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील बुरुडगल्ली येथील 4, संघवीनगर येथील 2, कुंभार गल्ली कसबा येथील 2, साठेनगर कसबा येथील 2, जळोची येथील 1, अशोकनगर येथील 1, मार्केट यार्ड रोड अमराई येथील 1 व शहरातील 1 असे 14 जण तर पारवडी येथील एक, पाहुणेवाडी येथील एक, काटेवाडी घुले वस्ती येथील एक, माळेगाव येथील एक, वाघळवाडी येथील एक व कटफळ येथील एक असे ग्रामीण भागातील 6 असे एकूण 20 जणांची ऍन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.