मुंबई – सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतेच सुयश टिळक आणि आयुषी भावेचे लग्न पार पडले. त्यानंतर अभिनेत्री हृता दुर्गुळेचा प्रतीक शाहसोबत साखरपुडा पार पडला.
आता लवकरच सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायक ‘रोहित राऊत’ आणि गायिका ‘जुईली जोगळेकर’ लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच या दोघांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला असून, या सोहळ्या दरम्यानचे काही फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रोहित राऊत झी मराठीवरच्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता. याच कार्यक्रमात जुईलीदेखील होती. तिथे या दोघांची ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री बहरत गेली.
पुढे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्याची कबुली त्यांनी सोशल मीडियावर दिली. त्यांची जोडी अनेकांना आवडते. हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
त्यांचे फॅन्स सुद्धा ‘रोहित-जुईली’च्या फोटोंवर लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करतात. आता चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत असून, येत्या 26 जानेवारी रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय.