Rohit Pawar – राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांच्या बारमती अॅग्रो कंपनीवर गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी केली होती. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात आला होता. गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस आली होती. अशात आज रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे. याच चौकशीवरून रोहित पवार यांनी सरकारच्या दबावाखाली ईडीने (ED) काही चुकीची कारवाई केली तर घाबरुन जाऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,’#ED कार्यालयात उद्या (बुधवार दि. २४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत #ED ने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. ‘
#ED कार्यालयात उद्या (बुधवार दि. २४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत #ED ने काही चुकीची कारवाई केली तर… pic.twitter.com/29d8ILhHNB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 23, 2024
ते पुढे म्हणाले, ‘कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय! माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खा. सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय!’ असं म्हणत रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.