मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, मशिदींच्या भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार, असा इशारा ठाकरे यांनी दिला. राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन अनेक प्रतिक्रिया येत आहे.
भक्ती, शक्ती, युक्ती, कर्म आणि बुद्धीचा संगम म्हणजे श्री हनुमान! द्रोणागिरी पर्वत उचलण्याची अफाट ताकद असूनही त्याचा गैरवापर न करता दोन गटात समेट घडवून आणण्यासाठी त्यांनी दूत म्हणून नेहमीच प्रयत्न केला. हनुमानरायांची भक्ती वेळेप्रमाणे कधीही बदलली नाही तर ती एकनिष्ठ होती. pic.twitter.com/N4eQ05rhCX
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 16, 2022
यातच आज हनुमान जयंती निमित्त राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी पवार यांनी ट्विट करत अप्रत्यक्ष विरोधकांवर निशाणा साधला.
काय आहे रोहित पवार यांचं ट्विट
भक्ती, शक्ती, युक्ती, कर्म आणि बुद्धीचा संगम म्हणजे श्री हनुमान! द्रोणागिरी पर्वत उचलण्याची अफाट ताकद असूनही त्याचा गैरवापर न करता दोन गटात समेट घडवून आणण्यासाठी त्यांनी दूत म्हणून नेहमीच प्रयत्न केला. हनुमानरायांची भक्ती वेळेप्रमाणे कधीही बदलली नाही तर ती एकनिष्ठ होती.असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.